धावत्या स्कूटरवरून फटाक्यांचा बाॅक्स रस्त्यावर पडला अन् स्फोट; १० ठार, भयानक व्हिडिओ व्हायरल

Fireworks Blast In Andhra Pradesh : आंध्र प्रदेशातील एलुरुमध्ये स्कुटरवरून फटाक्यांचा बाॅक्स घेऊन जात असतानाच बाॅक्स रस्त्यावर पडून बाॅम्बसदृश्य स्फोट झाला. या स्फोटात एकाचा दुर्दैवी अंत झाला, तर 6 जण जखमी झाले. स्फोटावेळी रस्त्याच्या

 

👇👇👇👇

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

👇👇👇👇

 

 

बाजूला उभ्या असलेल्या 3 जणांसह एकूण 6 जण जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना दिवाळीच्या दिवशी घडली आणि त्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ गुरुवारी रात्री उशिरा समोर आला. एका पांढऱ्या स्कूटरवरून दोन लोक एका अरुंद रस्त्यावरून वेगाने जात होते. वेळ दुपारची होती. स्कूटरस्वाराच्या हातात ‘कांदा बॉम्ब’चा बाॅक्स होता. गल्लीचा रस्ता आणखी रुंद होऊन मुख्य रस्त्याला जोडतो, तिथे स्कूटी पोहोचल्यावर अचानक खड्डा दिसतो, त्या खड्ड्यात स्कुटी गेल्याने बाॅक्स खाली कोसळला आणि मोठा स्फोट झाला.

 

 

वृत्तानुसार, या स्फोटाचा आवाज आयईडी बॉम्बसारखा मोठा होता. स्फोटानंतर परिसरात धुराचे लोट पसरले. सर्वत्र तुकडे उडून गेले. धूर निघू लागताच दोघे जण कसेतरी स्फोटातून बचावले आणि सुरक्षित स्थळी धावले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्कूटरचे काही तुकडे दूरवर विखुरलेले दिसत आहेत.

फटाक्यांमधून एवढा मोठा स्फोट कसा झाला?
सुधाकर असे स्कूटरस्वाराचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघातात जखमी झालेल्या सहा जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या जखमी आणि मृतांची नावे व वय देण्यात आलेले नाही. फटाक्यांमुळे अचानक एवढा मोठा स्फोट कसा झाला, याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 

 

आंध्रमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, 2 ठार
आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी येथे 30 ऑक्टोबरच्या संध्याकाळी फटाका उत्पादन युनिटला लागलेल्या आगीत दोन महिला जिवंत जळाल्या. अन्य पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. मुसळधार पाऊस आणि वादळ दरम्यान, उंद्रजावरम मंडलातील सूर्याओपालम येथील फटाक्यांच्या कारखान्याला वीज पडली, परिणामी आग लागली. पोलिसांनी सांगितले की, व्ही. श्रीवल्ली (42) आणि जी. सुनीता (35) गंभीर जखमी झालेल्या इतर पाच जणांना तनुकू शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नऊ कामगार किरकोळ जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राम शिवाजी हा फटाका बनवण्याचे युनिट चालवत होता. त्याचा परवानाही त्याच्याकडे होता.

Leave a Comment