10वी 12वी बोर्ड परीक्षांचे नवीन वेळापत्रक जाहीर

ssc timetable 2024 यंदा इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पूर्वपिक्षा दहा दिवस अगोदर घेतली जाणार आहे. पण, पुणे बोर्डान निश्चित केलेले अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा अडथळा येवू शकतो. यासंदर्भात बोर्डाने निवडणूक आयोगाकडे विचारणा केली असून तेथून परवानगी मिळाल्यावर काही दिवसांत वेळापत्रक जाहीर होईल, अन्यथा निवडणुकीनंतरच ते जाहीर केले जाईल, असे बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

दहावी बारावी बोर्ड परीक्षा चे वेळापत्रक पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून तर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. तत्पूर्वी, त्यांचे प्रात्यक्षिक तथा तोंडी परीक्षा पार पडणार आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी सर्वच केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे व सरमिसळ पद्धत अवलंबली जाणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तात्पुरते परीक्षा वेळापत्रक जाहीर केल्यावर त्यावर राज्यभरातून हरकती मागविल्या होत्या. त्यासंदर्भात केवळ ४० हरकती प्राप्त झाल्या होत्या, त्याही किरकोळ स्वरूपाच्या होत्या. त्यामुळे बोर्डाने तेच वेळापत्रक अंतिम केले आहे.

दहावी बारावी बोर्ड परीक्षा चे वेळापत्रक पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

आता फक्त दहा दिवस अलीकडे होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक आचारसंहितेत प्रसिद्ध करता येईल का, यावर मार्गदर्शन घेतले जात आहे. आचारसंहितेचा काही अडथळा नसल्यास काही दिवसांत ते जाहीर होईल. दुसरीकडे परीक्षा दहा दिवस अलीकडे घेतल्याचे राजकीय भांडवल होणार नाही, याचीही खबरदारी घेतली जात आहे. कारण, १० ते २० पटसंख्येच्या शाळांच्या बाबतीतील निर्णय घेतल्यावर असाच प्रकार झाला होता. त्यामुळे बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी आणखी काही दिवसांची वाट पहावी लागेल, असेही वरिष्ठ अधिकारी म्हणाले आहेत.

दहावी बारावी बोर्ड परीक्षा चे वेळापत्रक पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

परीक्षा १० दिवस अगोदर का?

२२,००० किमती पर्यतची मोफत भेटवस्तू निवडा

सकाळ डिजिटल साठी सबस्काइव करा आणि आपली ग्रास भेटवस्तू निवडा.

सकाळ

लाभ घ्या

• परीक्षा दहा दिवस अगोदर घेतल्यास विद्यार्थ्यांना जेईई, नीट परीक्षेच्या तयारीसाठी वेळ मिळेल

परीक्षांचा निकाल नेहमीपेक्षा १५ ते २० दिवस अगोदर लागू शकतो

• पुरवणी परीक्षा वेळेत घेऊन त्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही पुढील प्रवेशास अडचणी येणार नाहीत

Leave a Comment