गुलाबी साडी गाण्यावर शिक्षक- विद्यार्थ्यांचा भन्नाट डान्स; व्हिडीओ व्हायरल

teacher video viral 2024 हल्ली सोशल मिडीयावर अनेकजण वेगवेगळ्या गाण्यांवर रील्स बनवत आहेत. कित्येक रील्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. अशातच एका गाण्याने शिक्षकालाही भुरळ पाडली.

 

टिक टॉक आल्यापासून बऱ्याच लोकांना त्यांच्या कलागुणांसाठी एक प्लॅटफॉर्म मिळाले. पेटींग, गाणी आणि वेगवेगळ्या कला दर्शवत टिक टॉक बनवू लागले. ते बंद झाल्यानंतर इन्स्टाग्रामवर रील्स हा ऑपश्न आला आणि त्यावरही पुन्हा व्हिडीओ बनवणे चालू झाले. हल्ली सोशल मिडीयावर अनेकजण वेगवेगळ्या गाण्यांवर रील्स बनवत आहेत. कित्येक रील्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात.

 

सोशल मीडियावर बदो बदी, सुसेकी, अंगारो ही गाणी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. पण या गाण्याव्यतिरीक्त काही महिन्यांपूर्वी गुलाबी साडी गाणं व्हायरल झाले होते. लाहनांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच यावर रील्स बनवत होते. आश्चर्य म्हणजे या गाण्यावर शिक्षकानेही विद्यांर्थ्यांसोबत एक रील बनवली आहे.आपण शाळा महाविद्यालयांमधील शिक्षकांचे अभ्यासाचे, माहितीपर गोष्टींचे व्हिडीओ पाहिले. पण सध्या शिक्षकाचा डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत शिक्षक विद्यांर्थ्यासोबत चक्क गुलाबी साडी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, शाळेत शिक्षक विद्यार्थ्यांच्या मधोमध उभे राहून डान्स करत आहे. सुंदर आणि हटके एक्सप्रेशन देत विद्यार्थीसुद्भा गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यावर शिक्षकाने व्हिडीओला शाळेमध्येही गुलाबी साडी असे कॅपशन दिले आहे.

 

व्हिडीओला बारा मिलीयनहून अधिक व्हूज, आठ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाल्या आहेत. कमेंट्सचा भरभरून वर्षाव झाला आहे. “ही कोणती शाळा आहे?” असे एकाने विचारले आहे. तर दुसऱ्या युजरने, डान्स करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या एक्स्प्रेशनचे कौतुक केले आहे, एका युजरने लिहिलंय की, “शिकू द्या रे लेकरांना, उगाच नका नादी लावू”, तर आणखी एका युजरने लिहिलंय की, “मुलांच्या शाळा आणि अभ्यासावर लक्ष द्या, हे आपल्याला आयुष्यभर कधीही शिकता येईल.”

Leave a Comment